Home महाघोटाळा समाज कल्याण विभाग,नागपुरचा महाघोटाळा, शासनाचे जवळपास 9 कोटी लंपास

समाज कल्याण विभाग,नागपुरचा महाघोटाळा, शासनाचे जवळपास 9 कोटी लंपास

96
0

समाज कल्याण विभाग,नागपुर येथील सन 2020 ते 2021 या कालावधित प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत ” कौशल विकास ” या शीर्षकाखाली नागपुर जिल्ह्यातिल 13 तालुक्यांमधील जवळपास 100 महिला बचत गटांना समाज कल्याण विभाग, नागपुर यांच्यातर्फे जवळपास 9 कोटि रूपयांचे शेतीचे औजारे देण्यात आले होते, परंतु काही महिला बचत गटांनी शासनातर्फे बचत गटांना येणारे आर्थिक सहाय्य काही अनोळखी व्यक्तिनी स्वतःला अधिकारी सांगून प्रत्येकी 2-2 ब्लेंक चेक घेतले आणि समाज कल्याण, नागपुर तर्फे रक्कम महिला बचत गटच्या खात्यात येताच त्यांना न सांगता काढून टाकले तसेच त्यांना शासनाकडून मिळणारे शेतीचे औजारे सुद्धा खोटे सांगून चोरुन नेले या सर्व गैरप्रकाराची तक्रार होताच समाज कल्याण विभाग, नागपुर यांच्या तर्फे श्रीमती अंजलि चिवंडे मॅडम यांच्या अध्यक्षते खाली चौकशी समिति गठित करण्यात आली त्यात प्रत्यक्ष भेटि देऊन समितिने तथ्यांच्या आधारावर अहवाल तयार केला त्यात असे निदर्शनास आले की बहुतांश महिला बचत गट या अधिकृत नव्हत्या परंतु त्यांना लाखो रुपये रक्कम देण्यात आली, तसेच हा घोटाळा जवळपास 9 कोटिंचा असून महिला बचत गटांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवनुक केलेली आहे हे समितिला आढळून आले.
त्या अनुषंगाने 1 वर्षा आधीच सविस्तर अहवाल मा. जिल्हाधिकारी महोदय, नागपुर यांना सादर करण्यात आला परंतु त्यांनी अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही, तसेच या संपूर्ण प्रकरणात त्यावेळेचे तत्कालीन सहा. आयुक्त, समाज कल्याण विभाग, नागपुर यांना प्रमोशन मिळनार असल्याचे समजल्यामुळे या प्रकरणाला ठंड बस्त्यात टाकण्यात आले, तसेच त्यावेळेचे तत्कालीन सहा. आयुक्त, नागपुर आता प्रादेशिक सहा, आयुक्त समाज कल्याण, नागपुर या पदावर्ती रुजू आहेत.
हा फक्त एक आर्थिक घोटाळा नसून गोर गरीब महिलांची फसवणूक आहे.त्यामुळे आज भा.ज.यु.मो (नागपुर ग्रामीण) तर्फे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकारी, नागपुर, तसेच मा.आ.डॉ. आशिष देशमुख यांना तक्रार देऊन शासनातर्फे उच्च स्तरीय समिति गठित करुण दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली त्यामुळे तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता मा.मुख्यमंत्री यांनी त्वरित सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here