Home अपराध पर्यावरणास अपायकारक असणारा प्रतिबंधीत नायलॉन मांजाची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद ३४...

पर्यावरणास अपायकारक असणारा प्रतिबंधीत नायलॉन मांजाची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद ३४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

29
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
दिनांक ०८/१२/२०२५ रोजी कळमेश्वर पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा गोंडखैरी, व्हि.आर.एल. लॉजीस्टिक यार्ड येथे कंटेनर क्रमांक जी जे २१ वाय ३३१८ यामध्ये प्रतिबंधीत नायलॉन मांजाची वाहतूक होत असुन सदरचे कंटेनर हे अनलोडींग करीता व्हि.आर.एल. लॉजीस्टिक, गोंडखैरी येथे उभे आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे कळमेश्वर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक जी जे २१ वाय ३३१८ ची पंचासमक्ष तपासणी केली असता नमुद कंटेनर मध्ये बॉक्स मध्ये नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीमध्ये गुंडाळलेले मिळुन आले. आरोपीचे ताब्यातून एकुण १२०० नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्री किंमती १४,४०,०००/- रूपये तसेच कंटेनर किंमती २०,००,०००/- रूपये असा एकुण ३४,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे. चालकाचे नाव विचारले असता आरोपी चालक नामे छविनाथ मोहन निशाद, वय ३० वर्ष, रा. विंध्याचल गाव, बसई कालन, राजापुर, जि. मिर्झापुर, राज्य उत्तर प्रदेश अशी माहीती प्राप्त झाली. त्याला नायलॉन मांझा कोठुन आणला याबाबत विचारना केली असता त्याने सांगितले की, नमुद प्रतिबंधीत नायलॉन मांजा हा सुरत, गुजरात येथुन लोड करून आणलेला आहे.
नमुद प्रकरणी आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन कळमेश्वरला कलम १२५, २२३ भा.न्या. सं. सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here