Home जागरुकता मा. पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी घेतली माजी सैनिक कुटुंब सुरक्षा...

मा. पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी घेतली माजी सैनिक कुटुंब सुरक्षा समितीची बैठक

40
0

नागपुर ग्रामीण जिल्हयाअंतर्गत दर महीन्याच्या ५ तारखेला पोलीस अधिक्षक कार्यालय, नागपुर ग्रामीण जिल्हा येथे मा. श्री. हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नागपुर यांच्या उपस्थितीत नागपुर ग्रामीण जिल्हयातील माजी सैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात येते. सदर बैठकीत नागपुर ग्रामीण जिल्हयातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना असलेल्या अडचणी, तकारी असेल तर त्यांचे निराकरण व समाधान केले जाते.

आज दिनांक ०५/१२/२०२५ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, नागपुर ग्रामीण जिल्हा येथे झालेल्या माजी सैनिकांच्या बैठकीमध्ये मा.श्री. हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा, यांनी माजी सैनिकांकडुन प्राप्त तक्रारींबाबत तात्काळ कारवाई करत संबधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात आले. सदर बैठकीत श्री मनोज चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नागपुर, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती माधुरी गायकवाड, प्रभारी अधिकारी, भरोसा सेल, नागपुर ग्रामीण, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती ज्योत्स्ना गिरी, प्रभारी अधिकारी, मानव संसाधन शाखा, नागपुर ग्रामीण, नागपुर ग्रामीण जिल्हयातील माजी सैनिक आणि इतर पोलीस अंमलदार हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here