गिरीश आंदे
सावनेर पोलीस स्टेशनच्या इतिहासात प्रथमच महिला पोलीस निरीक्षक म्हणून ऋतुजा दिपक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलातून दिनांक १३ मे २०२६ रोजी त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी १४ मे २०२६ रोजी सावनेर पोलीस स्टेशनचा तात्काळ पदभार स्वीकारून आपल्या सेवेला सुरुवात केली.
यावेळी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे सावनेर परिसरात महिला नेतृत्वाला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान,व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे यांच्या उपस्थितीत ऋतुजा जाधव यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे बाबा टेकाडे,राहुल सावजी,मनोहर घोडसे,नितेश गव्हाणे,गिरीश आंदे,संतोष धानोरकर आणि अनुप पठाणे,पुरुषोत्तम नागपुरकर,अशोक काळबांडे,साहिल निघोट उपस्थित होते.
Home सामाजिक व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेकडून सावनेरच्या पहिल्या महिला पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव...




