मा. अपर पोलीस महासंचालक, महीला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशाने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक ०१/११/२०२५ ते १५/११/२०२५ रोजी पर्यंत “ऑपरेशन शोध २” मोहीम राबविण्यात आली. या मोहीमे अंतर्गत नागपूर ग्रामीण जिल्हा येथे हरविलेल्या / पळविलेल्या प्रकरणांमधील बालकांचा शोध घेण्याकरीता विविध शोध पथके नेमुन यशस्वीरित्या मोहीम पार पाडण्यात आली. मा.श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण, जिल्हा यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेचे नेतृत्व श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी केले असुन AHTU (Anti Human Trafficking Unit) चे प्रमुख, पोलीस निरीक्षक श्री मिलींद तायडे आणि त्यांचे पथकांसह प्रत्येंक उपविभागात १ असे एकुण ६ मिसींग सेल स्थापन करण्यात आले. स्थापन केलेल्या विविध पथकांनी तांत्रिक पुरावे तसेच गुप्तबातमीदार यांच्या मदतीने हरविलेल्या / पळविलेल्या अल्पवयीन बालकांचा कसुन शोध घेतला.
“ऑपरेशन शोध २” अंतर्गत दिनांक ०१/११/२०२५ ते १५/११/२०२५ रोजी पर्यंत सन २०२१ पासुन हरविलेल्या/पळविलेल्या १० अल्पवयींन बालकांचा शोध घेण्यात आला तसेच यानंतर सुध्दा सदर मोहीम मा.श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण, जिल्हा यांच्या आदेशाने सुरूच ठेवुन अधिक ८ अल्पवयीन बालाकांचा शोध घेण्यात आला. एकंदरीत एकुण १८ हरविलेल्या/पळविलेल्या अल्पवयीन बालकांचा शोध घेतला. अशा प्रकाराची अल्पवयीन बालकांबाबतच्या प्रत्येक तक्रारीची नागपूर ग्रामीण पोलीस गंभीर दखल घेतात आणि मदतीस तत्पर असतात.




