Home राजकीय मोहपा नगरपालिकेत राजकीय रणधुमाळी! नगराध्यक्ष पदासाठी पाच दिग्गज आमनेसामने – ६३ उमेदवारांनीही...

मोहपा नगरपालिकेत राजकीय रणधुमाळी! नगराध्यक्ष पदासाठी पाच दिग्गज आमनेसामने – ६३ उमेदवारांनीही माघार न घेता रंगत वाढवली

53
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
मोहपा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी पाच मानांकित उमेदवार रणांगणात उतरले असून—विजय वानखेडे (उद्धवसेना), प्रवीण श्रोते (भाजप), माधव चर्जन (काँग्रेस), हरिओम नेरकर (राष्ट्रवादी–शरद पवार), तर भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून श्रीकांत येनूरकर यांनीही जोरदार एंट्री घेतली आहे.
नगराध्यक्षांसह २० नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने स्पर्धा चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे. एकूण ६३ उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरल्यानंतर मोहोपाच्या राजकारणात रंगत आणखी वाढली आहे.
नगरसेवक पदांसाठी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी २०–२० उमेदवार रिंगणात उतरवून दणक्यात मुकाबल्याची तयारी दाखवली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून १५, बहुजन समाज पक्षाचे ४ आणि त्यासोबत ४ अपक्ष असे एकूण ६३ उमेदवारांनी मतदानाच्या रणधुमाळीत आपली उपस्थिती ठळक केली आहे.
या पाचमुखी नगराध्यक्ष लढतीसोबत दहा प्रभागांत बहुकोनी स्पर्धेची चिन्हे स्पष्ट दिसत असून मतदारांची मते कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोहप्यातील ही निवडणूक ‘चकमकींची’ ठरणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here