अशोक काळबांडे (सावनेर)
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती सावनेर पंचायत समितीच्या सभागृहात दिनांक 31 मे 2026 रविवारी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रा बाबा टेकाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून सावनेर तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा व्हीएसपीएम अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनचे संचालक ॲड.चंद्रशेखर बरेठिया, मेन लाईन पांडव करिअर अकॅडमीचे संचालक कृष्णकांत पांडव, राजमाता अहिल्यादेवी होळकर संस्थापक शिव पाल, कार्याध्यक्ष सुनिता पाल, जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
अध्यक्षीय भाषणात प्रा. बाबा टेकाडे यांनी राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श ठेवला पाहिजे. दुःखाचा डोगर डोक्यावर असूनही अगदी शांतपणे रयतेच्या कल्याणचे कार्य केले. गोरगरीब लोकांचे जीवन सुखकर कसे होईल असा दृष्टिकोन समोर ठेवला. घाट बांधले, मोठमोठी तीर्थस्थळें उभारली. निवारे निर्माण केले. जनतेचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून प्रत्येकाला 12 विविध फळाचे वृक्ष दिली. यापैकी 7 वृक्षाची फळे त्यांच्या उदरनिरव्हा करिता. तर 5 वृक्षाची फळे शासनाला कर म्हणून दिली जात होती. हीच पद्धत म्हणजे आजचा 7/12 आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले अहिल्यादेवीने सती जाणे बालविवाह अस्या अनेक कुप्रथा नष्ट केल्या. त्याकाळातील प्रथम महिला राज्यकर्त्या म्हणून त्यांचा आदर्श आजही कायम आहे. समाज बांधवानी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेटकराचा शिका संघटित वहा आणि संघर्ष करा.मुलमंत्र अंगीकरला पाहिजे. तरच समाजाला न्याय मिळेल असेही संगितले.
मुंबई – पुणे मार्गाला शिग्रोबा धनगर मिसिंग लींक नाव देण्याच्या मागणी साठी संपुर्ण महाराष्ट्रात जनाआंदोलन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
ॲड.चंद्रशेखर बरेठिया यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी लहानपणा पासूनच न्याय, शिस्त, शस्त्र आणि शात्राचे धडे घेतले. महिला राज्यकर्ती असूनही निर्धास्तपणे लढली.यामुळे तिचा संपूर्ण राज्यावर दबदबा होता असे सांगितले. अन्य मान्यवरानी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन महादेव खराबडे यांनी केले.उमेश टेकाडे यांनी आभार मानले.
प्रसंगी वासुदेव बोदे, गुलाब टेकाडे, यशवंत पाटील,रामेश्वर चाके, हिरालाल आगरकर,रमेश टेकाडे, दौलत डहाके, संजय टेकाडे,नितीन बोदे, शरद टेकाडे, अशोक भुजाडे, रमेश बांबल,लक्ष्मण तवले, अशोक ढवळे, रवी मेश्राम,शान्तनू नाईक आदि सह विविध गावातील धनगर बांधव उपस्थित होते.




