Home Breaking News २७ मे रोजी २७ ग्रामपंचायतींमध्ये नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रिया रमेश मानकर...

२७ मे रोजी २७ ग्रामपंचायतींमध्ये नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रिया रमेश मानकर यांनी राबविले”एक घर, एक झाड” अभियान

5
0

गिरीश आंदे
दिनांक २७ मे रोजी प्रिया रमेश मानकर यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त २७ ग्रामपंचायतीमध्ये पिंपळाचे झाड लावून “एक घर,एक झाड” अभियान राबविले.
या अभियानामध्ये ग्रामपंचायतीतील पदाधिकारी,युवक, महिला,सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी प्रिया रमेश मानकर यांनी नितीन गडकरी यांच्या विकासाभिमुख आणि पर्यावरणपूरक विचारांचा उल्लेख करत नागरिकांना झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात प्रिया रमेश मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भावी पिढीसाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संदेश दिला.
पिंपळाचे झाड हे इतर झाडांच्या तुलनेत सर्वाधिक ऑक्सिजन सोडणारे वृक्ष मानले जाते. हे दिवस-रात्र ऑक्सिजन निर्माण करते, ज्यामुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते. पिंपळ वृक्ष हे आध्यात्मिक, आयुर्वेदिक आणि धार्मिकदृष्ट्या विशेष महत्वपूर्ण आहे.
म्हणून पिंपळ वृक्षाचे महत्त्व लक्षात घेऊन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक भेट देण्याच्या निर्धाराने प्रिया रमेश मानकर यांनी हा उपक्रम हाती घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here