Home जागरुकता संजय गांधी, श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांनी ३० मेपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करावे –...

संजय गांधी, श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांनी ३० मेपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करावे – तहसीलदार विकास बिक्कड यांचे आवाहन

2
0

गिरीश आंदे
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी निवृत्तिवेतन योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र (डिजिटल लाइफ सर्टिफिकेट) येत्या ३० मेपर्यंत ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन कळमेश्वरचे तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले आहे. लाभार्थ्यांचे अनुदान विनाअडथळा नियमित सुरू राहण्यासाठी प्रशासनाने ही मुदत दिली आहे.
• या केंद्रांवरून करता येणार ऑनलाइन अर्ज
लाभार्थ्यांना त्यांचे हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
‘आपले सरकार’ सेवा केंद्र
सेतू केंद्र
नागरी सुविधा केंद्र (CSC)
• वेळ आणि पैशांची होणार बचत!
“या डिजिटल सुविधेमुळे वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना आता बँक किंवा तहसील कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ३० मेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.”
— विकास बिक्कड, तहसीलदार, कळमेश्वर
अनुदान नियमित सुरू ठेवण्यासाठी आवाहन मुदतीनंतर प्रमाणपत्र सादर न केल्यास अनुदान मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कळमेश्वर तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत आपले डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here