दिनांक ०८/११/२०२५ रोजी सावनेर पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फतीने खबर मिळाली की, आरोपी नामे जागेश्वर उर्फ नानबच्चा शिवबालक कश्यप हा त्याचे घरी मौजा वाघोडा, ता. सावनेर येथे अवैधरित्या गांजा बाळगुन गांजाची विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ पंचासमक्ष मौजा वाघोडा येथे पंचासह धाड टाकुन आरोपी नामे आरोपी नामे जागेश्वर उर्फ नानबच्चा शिवबालक कश्यप, वय ४५ वर्ष रा. मस्के ले आउट, वार्ड कं ३, वाघोडा, ता सावनेर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली तसेच त्याचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता अंमली पदार्थ गांजा मिळुन आला. पोलीसांनी पंचासमक्ष ०.९१३ किलो गांजा किंमती १३,१५५/- रूपये असा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी जागेश्वर उर्फ नानबच्चा शिवबालक कश्यप, वय ४५ वर्ष, रा. मस्के ले आउट, वार्ड कं ३, वाघोडा, ता सावनेर याचे विरुध्द पोस्टे सावनेर येथे एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Home अपराध अवैधरीत्या गांजा (अंमली पदार्थ) बाळगुन विक्री करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा नोंद, सावनेर पोलीसांची...




