गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील कळमेश्वर व मोहपा नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली असली तरी अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाकडून — काँग्रेस, भाजप वा इतर प्रादेशिक पक्षांकडून — अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही.
या विलंबामुळे दोन्ही नगरपरिषदेच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत गटबाजी शिगेला पोहोचल्याची चर्चा मतदारांमध्ये जोरात सुरू आहे. स्थानिक पातळीवर अनेक दावेदार पुढे सरसावत असताना, पक्षश्रेष्ठींच्या डोकेदुखीत भर पडली आहे.
दरम्यान, काही ठिकाणी बंडखोर कार्यकर्त्यांनी स्वतंत्र उमेदवारीचा इशारा दिल्याने पक्षांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. उमेदवार निश्चित करण्यात होणारा विलंब हा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असून, याचा फटका आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला बसतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजकीय पातळीवर मात्र एकच चर्चा -“उमेदवारीच्या प्रतीक्षेत राजकारण तापलेलं, कोण घेणार बाजी?”
Home Breaking News कळमेश्वर-मोहप्यात नगरपरिषदेच्या उमेदवारीवरून सत्ताधारी- विरोधकात खळबळ ! गटबाजीने पक्षश्रेष्ठी हैराण




