दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी कामाक्षी सेलिब्रेशन, सावनेर येथे आम आदमी पार्टीतर्फे भव्य कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभा संपन्न झाली. या कार्यक्रमाला दिल्ली विधानसभेच्या उपसभापती मा. राखी बिर्ला यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या सभेला 500 हून अधिक कार्यकर्ते तसेच सावनेरमधील नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून कार्यक्रमाला ऐतिहासिक यश दिले.
आम आदमी पार्टी ही काळाची गरज आहे.आपल्या प्रभावी आणि जोशपूर्ण भाषणातून राखी बिर्ला यांनी सांगितले की “आम आदमी पार्टी ही सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी खरी जनतेची पक्षशक्ती आहे”. त्यांनी सावनेर तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांच्या कामाचे कौतुक करत म्हटले की, “सावनेरमध्ये आम आदमी पार्टीने निर्माण केलेली संघटनशक्ती आणि जनसंपर्क अभूतपूर्व आहे.
राखी बिर्ला यांचे ऐतिहासिक उद्गार सावनेरमध्ये लोकांपर्यंत सत्य, विकास आणि पारदर्शकता नेणारे काम करणाऱ्या अश्विनी पंकज घाटोडे या येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आम आदमी पार्टीच्या झाडू चिन्हावर उमेदवार म्हणून उभ्या राहतील.” ही घोषणा होताच उपस्थित जनसमूहात प्रचंड जल्लोष उसळला.
अश्विनी पंकज घाटोडे यांचे प्रभावी भाषण त्यांनी सावनेर शहरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्या, त्यांच्या मुळ कारणांवर भाष्य करत, नवीन सावनेरसाठी प्रेरणादायी विकास आराखडा सादर केला. त्यांच्या विचारशील आणि प्रामाणिक मांडणीने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
पंकज घाटोडे यांनी सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार मानत सांगितले की, “सावनेरचा प्रत्येक नागरिक हा आम आदमी पार्टीच्या परिवर्तनाच्या प्रवासाचा भाग आहे.” या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ढोबळे आणि तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर वाघमारे यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक झाले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंत ढोके, संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, प्रदेश सचिव अभिजीत मोरे, रामटेक लोकसभा प्रभारी शैलेश गजभिये, नागपूर शहर प्रभारी श्यामभाऊ बोकडे, प्रदेश सचिव सुनील वडसकर, जिल्हा अध्यक्ष वृशभ वानखेडे, तसेच सावनेर तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ढोबळे जिल्हा महासचिव जामवंत वारकरी, ज्येष्ठ नेते संजय टेंभेकर, जिल्हा संघटन मंत्री संजय राऊत,सावनेर शहर अध्यक्ष गजु चौधरी, मदन मोरे, अरुण गुरव, कालिदास बुधोलिया, मोरेश्वर वाघमारे, योगेश राऊत, प्रेमीला टेंभेकर, अनिता धनवले, ज्योती बुधोलिया, श्रेया वारकरी, रूही शेख, वैशाली जवंजाळ, नेहा शेख, पायल बन्सोड, छत्रपती लांबट, दिनेश मछले, रवी वानखेडे, महेंद्र गोंढाणे, अनामिका ढिमोले, रुई शेख, अन्सार शेख, कुणाल कोलते, बंडू चौरागडे, प्रमोद तिखे, गिरीश फळके, रमेश धनोले, वैष्णव ठाकूर, शुभम बन्सोड, शुभम साबळे, विजय डोंगरे, रितेश घोळसे, गौरव घोळसे, उमेश घोळसे, यश लाडे, किशोर महंत, यश मोगरे तसेच इतर अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेने सावनेरच्या राजकारणात नवा इतिहास रचला असून, जनतेत “सावनेर बदलेल – झाडूच फिरेल!” असा जनआवाज घुमला.




