Home Breaking News धापेवाडा येथे विज कोसळून मृत्यूमुखी पावलेल्या कुटुंबाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार...

धापेवाडा येथे विज कोसळून मृत्यूमुखी पावलेल्या कुटुंबाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार डॉ.आशिष देशमुख यांचाकडुन सांत्वन व शासनाकडून धनादेश देऊन आर्थिक मदत

116
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा बु.तालुका कळमेश्वर येथील काल शेतात काम करत असताना शेतामध्ये विज पडून वंदनाताई प्रकाश पाटील, व त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील तसेच शेतात काम करणाऱ्या निर्मलाताई रामचंद्र पराते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आज दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दोन्ही कुटुंबात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी भेट देत सांत्वन केले व शासनाकडून प्रति व्यक्ती 4 लक्ष धनादेश देत आर्थिक मदत केली व मृत्यूमुखी पडलेल्याना श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळेस राजीवजी पोतदार,मनोहर कुंभारे,जिल्हाधिकारी विपीन इटनकर,प्रमोद हती उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here