गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांनी २५ जून २०२५ नंतर कापूस,तुर,सोयाबीन,ज्वारी अशा पिकाची लागवड व पेरणी केली असून आधीच पावसाच्या कमतरता मुळे पिके वाढ न झाल्याने संकटात आली होती.
तर आता दोन महिने लागवडीला व पेरणीला होऊन सुद्धा कळमेश्वर तालुक्यातील डी.ए.पी व युरिया खताच्या संकट आज जशाच्या तसेच परिस्थितीत शेतकऱ्याच्या दाराशी पाहायला मिळत आहे. कळमेश्वर तालुक्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्याला पिकाला पाहिजेल ते खत देणे सुद्धा कठीण झाले असल्याची माहिती कळमेश्वर कृषी विभागाला माहिती असून सुद्धा अलक्ष केले असल्याचे दिसत आहे.शासनाकडून शेतकऱ्याला पाहिजेल त्या खताची उपलब्धता केले असल्याचे अधिकृत खत विक्रेत्याकडील स्टॉक मध्ये पहायला मिळत आहे किंवा नाही आणि आहे तर शेतकऱ्याला का खत मिळत नाही हा प्रश्न अजून पर्यंत कृषी विभाग कळमेश्वर मार्फत सोडविण्यात आलेला नाही ?
या संकटाविषयी कळमेश्वर तालुका सहकारी खरेदी विक्री अध्यक्ष बाबा कोढे यांच्या कडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की,कळमेश्वर तालुक्यात खरेदी विक्रीला पाहिजे त्या प्रमाणात युरिया व डी.ए.पी उपलब्ध होत नसून ज्या अधिकृत विक्रेत्याकडे युरिया व डी.ए.पी खत उपलब्ध आहे परंतु जो विक्रेत्या जास्तीचे पैसे कमावण्याचे नादात शेतकऱ्याला माल देत नसेल त्याकडे तालुका कृषी विभाग कळमेश्वर यांच्याकडून कारवाई होणे गरजेचे आहे.तरच युरिया व डी.ए.पी खत टंचाई प्रश्न मिटेल ?




