सावनेर
दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेर,सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्था, संविधान जागर अभियानांतर्गत कळमेश्वर येथील इंदिरा गांधी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मध्ये संविधानाची प्रास्ताविकेचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. एम. डब्लू. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अजय चिकाटे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संविधान जागर अभियानाचे स्वप्निल फुसे उपस्थित होते. त्याचप्रमाणे सेवकराम राऊत,डॉ. स्मिता शेंडे, एडवोकेट सोनाली, मनीषा साखरे,नरेंद्र पाटील, डॉक्टर राजेंद्र कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून झाली. जास्त वेळ न घालवता सरळ कार्यक्रमाला सुरुवात झाली यामध्ये सविधान जागर अभियानाचे स्वप्निल फुसे सर यांनी संविधानाच्या प्रास्ताविक आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण पासून तर स्वतः प्रत अर्पण करत आहे. पर्यंतची संपूर्ण माहिती वेगवेगळ्या उदाहरणं द्वारे समजून सांगितलं. कार्यक्रमाचे शेवट हे ॲडव्होकेट मोनाली मॅडमनी सादर केलेल्या संविधान जागर गीताने झाले.
कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन महाराष्ट्र अनिस चे जिल्हा युवा कार्यवाह मनीषकुमार अडागळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.मंजुश्री कापसे यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र कांबळे सर यांनी केले. कार्यक्रमाला चेतन ठवरे किशोर दुर्वे, राकेश लोहकरे, संजय रामटेके, सुकन्या घाटोळे, निधी गुप्ता, मंजुषा कापसे, जयश्री पांडे, मंजुषा धडे, महेश देवघरे सह इतर शिक्षक वर्ग तर सिमरन शेख,निधी सोनी, स्नेहा बांबोरिया सेजल तडस, अंशुका सातपुते सह इतर विद्यार्थी उपस्थित होते.
Home Breaking News इंदिरा गांधी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कळमेश्वर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती...




