Home Breaking News कळमेश्वर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद आरक्षण जाहीर

कळमेश्वर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद आरक्षण जाहीर

106
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) नागपूर इंदिरा चौधरी यांच्या पर्यवेक्षणाखाली व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, कळमेश्वर तहसील कार्यालयात आज सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पार पडली.
या वेळी तहसीलदार विकास बिक्कड, नायब तहसीलदार (निवडणूक) आबा वाघमारे,संदीप तडसे,ज्योती जाधव व निवडणूक लिपिक बिलाल खान उपस्थित होते.

पंचायत समिती सर्कलसाठी आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले.
तेलकामठी – सर्वसाधारण
कोहळी – सर्वसाधारण
धापेवाडा – अनुसूचित जमाती (महिला)
उबाडी – सर्वसाधारण
गोंडखैरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सेलू – अनुसूचित जाती (महिला)

त्यानंतर, जिल्हा परिषद नागपूर येथे बचत भवन सभागृहात देखील दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद साठी आरक्षण सोडत पार पडली.
जिल्हा परिषद सर्कलसाठी आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर झाले.
तेलकामठी – नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला)
धापेवाडा – सर्वसाधारण
गोंडखैरी – नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here