Home जागरुकता सावनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ – जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची संवेदनशील मतदान...

सावनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ – जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची संवेदनशील मतदान केंद्रांसह निवडणूक तयारीची पाहणी

50
0

नगरपरिषद सावनेर सार्वत्रिक निवडणूक २०२५ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर जिल्हा नागपूर यांनी मतदान यंत्रे तयार करत असताना सावनेर नगरपरिषदेस भेट दिली. त्यांनी नगरपरिषद सावनेर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सेन्सिटिव्ह बूथ असलेले पलिया हिंदी प्राथमिक शाळा या मतदान केंद्राची पाहणी केली.
त्यांच्या समवेत पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार , पिठासीन अधिकारी संपत खलाटे , जिल्हा सह आयुक्त नगर विकास विभाग श्री .विनोद जाधव जिल्हा नागपूर हे देखील उपस्थित होते. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्शिया जुही आणि संबंधित इतर सर्व अधिकारी यांची बैठक घेऊन होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अध्यक्ष व नगरसेवकांसाठी आलेल्या उमेदवार नामनिर्देशन पत्राची माहिती घेतली,
तसेच उमेदवार छाननी प्रक्रिया, चिन्ह वाटप प्रक्रिया या सर्वांची माहिती घेतली, त्याचबरोबर स्ट्रॉंग रूम ची पाहणी करून, ईव्हीएम मशीन , बायलोट युनिट, कंट्रोल युनिट, सर्व मतदान केंद्र, विविध प्रक्रिया विषयी माहिती घेऊन नोडल अधिकारी , झोनल अधिकारी ,मतदान कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रिया विषयी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here