Home Breaking News अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मौदा येथे विशेष बैठक संपन्न; ग्राहक संघटन बळकट...

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मौदा येथे विशेष बैठक संपन्न; ग्राहक संघटन बळकट करण्यावर भर

10
0

मौदा
“ग्राहकांचे संघटन ही काळाची गरज असून, सामान्यांच्या हक्कासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पश्चिम क्षेत्रिय संघटक नितिन काकडे यांनी केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मौदा तालुक्याच्या वतीने आयोजित विशेष बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.
मंगळवार, २८ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ही बैठक उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेचा विस्तार आणि तालुक्यातील ग्राहकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रमुख उपस्थितांचे मार्गदर्शन
बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ प्रांत आयटी सेल प्रमुख चंद्रशेखर साठे, पर्यावरण प्रमुख संजय आयलवार, नागपूर जिल्हाध्यक्ष संजय साळवे व मौदा तालुका मार्गदर्शक डॉ. निलिमाताई घाटोळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्य विस्तार: तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत अ.भा. ग्राहक पंचायतीचे कार्य पोहोचवण्यासाठी नव नवीन कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यावर भर देण्यात आला.
समस्या निवारण: एसटी बस, वीज, पाणी, आरोग्य आणि ऑनलाईन फसवणूक यांसारख्या स्थानिक ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर कायदेशीर मार्गाने कशी मात करता येईल, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
पर्यावरण व तंत्रज्ञान: ग्राहकांनी सजग राहून पर्यावरणाचे रक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
नियोजनावर चर्चा: बैठकीच्या उत्तरार्धात आगामी काळात गृह भेटी देऊन राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची रूपरेषा ठरवून संघटना विस्तारावी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दिनेश ढोबळे यांनी केले, सूत्रसंचालन उपाध्यक्ष ईश्वर पत्रे यांनी तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष डॉ. सुनील बोरकर यांनी केले.

कार्यक्रमला उपस्थित आणि यशस्वीतेसाठी मौदा तालुका उपाध्यक्ष दिगांबर बांगडकर, सहसचिव महेंद्र चकोले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य देवेंद्र सोनटक्के, प्रकाश कोरडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय गिरडे, अर्चनाताई रंगारी, गौरीताई वैद्य, नंदकिशोर कनोजे, निरंजन केळकर, कैलास मेश्राम आदी बैठकीला तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सजग नागरिक उपस्थित होते.

*”ग्राहकांचे संघटन, हीच काळाची गरज!”* या घोषणेने बैठकीचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here