गिरीश आंदे
दिनांक २८ एप्रिल २०२६ ला पंचायत समिती कळमेश्वर सभागृहात खरीप पूर्व हंगाम आढावा सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ आशिष देशमुख बोलताना शेतकऱ्यांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेती सोबत पूरक व्यवसाय रेशीम, दुग्ध व्यवसाय इत्यादी ची जोड दिल्यास शेतकऱ्यांचा नक्की फायदा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले. यावेळी येणाऱ्या खरीप हंगामात अमेरिका इराण युद्ध मुळे रासायनिक खताच्या तुटवडा भाषणाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक व जैविक पद्धतीने शेती करावी जगभरात चाललीनोचा प्रभाव असल्याने यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने ओलीत असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ओलितासाठी पटपाणी पद्धत न वापरता ड्रीप व स्प्रिंकलर पद्धतीने व ओलित करावे, यासाठी वाटेल तेवढे अनुदान देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी दिपाली कुंभार यांनी केले. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी शेतकऱ्यांची संवाद साधताना येणाऱ्या खरीप हंगामात तालुक्यात कुठल्याही बियाण्याची अथवा रासायनिक खताच्या तुटवडा पडणार नाही याची आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले संपूर्ण जगात ग्लोबल वार्मिंग मुळे अल निनो चा प्रभाव पडणार असून सरासरीपेक्षा यावर्षी कमी पाऊस पडणार असल्याची शास्त्रज्ञांची मत असल्याने त्याप्रमाणे पिकांमध्ये फेरपालट करण्याची सुद्धा शेतकऱ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर कुश मोटवानी उपविभागीय अधिकारी, सावनेर उपविभागीय कृषी अधिकारी काटोल बळीराम सातपुते तहसीलदार विकास बिक्कड, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, तालुका गुणनियंत्रण अधिकारी प्रशांत राऊत, भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे सह तालुक्यातील कृषी व संलग्न विभागाचे अधिकारी,कर्मचारी व मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन उप कृषी अधिकारी उज्वल डाखोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत मोरे यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील विविध शेतीसंबंधी उपक्रमात शेतकऱ्यांचे प्रमाणपत्र व समान चिन्ह देऊन माननीय आमदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तर यावेळी आमदारासमोरच मंचकावर बसलेले एका राजकीय नेत्यांनी आपल्या भाषणात स्वतःच्या कृषी केंद्राचे दीड महिन्याचे निलंबन केले असल्याने तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.
तर काही दिवसांपूर्वी तालुक्यातील गुणनियंत्रण विभागाने एमआयडीसी कळमेश्वर येथे स्थित एशियन केमिकल्स कंपनीवर धाड टाकून शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया जप्त केला असता कंपनी मालकासह इतर सह कृषी सेवा केंद्रांचे नाव आपल्या कबुली जबाब नोंदविल्यामुळे या सर्व कृषी केंद्र यांची चौकशी करून त्यांचे रासायनिक खताचे परवाने निलंबन केले होते.तर आता पुन्हा जीवे मारण्याच्या धमकी वरून अधिकारी व शेतकरी वर्गात चर्चेला उधान आले आहेत.




