सामाजिक सुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या १४० व्या जयंतीप्रमाणेच समाजसुधारक पेरियार ई.व्ही. रामास्वामी यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनकार महिला महाविद्यालयात दिनांक. १७ सप्टेंबर २०२५ रोजी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता टक्कामोरे होत्या. त्यांनी आपल्या भाषणात “प्रबोधनकारांचे विचार ही काळाची खरी गरज आहे” असे स्पष्ट मत व्यक्त केले. प्रमुख वक्ता रामजी महाजन नगरपरिषद शाळा, रामटेकचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद चोपकर यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रबोधनकार ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे विवेचन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. छाया वांढरे यांनी केले. प्रा. सुहाना खान यांनी प्रबोधनकार ठाकरे व पेरियार रामास्वामी यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. तसेच विद्यार्थिनी कु. धनश्री नगरे, कु. सना कुरेशी, कु. उर्वशी बावणे आणि कु. पायल भोंगारकर यांनी आपल्या भाषणातून प्रबोधनकारांचे विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षु हटवार यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. रचना बिसेन यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रभाकर बागडे, प्रा. विकास डांगरे, प्रा. माधुरी महाजन, प्रा. महेश मोहनकर, प्रा. जेबा खान, अर्चना कळंबे, प्राची बोंडणे, जोगेंद्र सूर्यवंशी, सचिन डोनारकर, युवराज वाडीभस्मे, जयश्री बागडे व भारती बागडे यांनी परिश्रम घेतले.
Home Breaking News प्रबोधनकार महिला महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे जयंती व पेरियार रामास्वामी जयंती उत्साहात साजरी




