Home Breaking News डाॅ.आदमने महाविद्यालयात मराठी भाषा वाड्.मय मंडळाचे उद्घाटन

डाॅ.आदमने महाविद्यालयात मराठी भाषा वाड्.मय मंडळाचे उद्घाटन

35
0

सावनेर
डाॅ.हरिभाऊ आदमने कला,वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच मराठी भाषा वाड्.मय अभ्यासमंडळाचे तसेच इंग्रजी भाषा अभ्यासमंडळाचा उदघाटन समारंभ आयोजित केल्या गेला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नागपूर येथिल कवी,निवेदक,पत्रकार शफी पठाण,धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अखिलेश पेशवे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र जुमडे,मराठी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डाॅ.प्रमोद लेंडे,डाॅ.मिलिंद साठे,इंग्रजी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डाॅ.प्रगटसिंघ बावरा,डाॅ.वंदना बावनकुळे मंचावर उपस्थित होत्या.
मराठी भाषेतील वाड्.मय हे अक्षर साहित्य आहे. मुकुंदराजाचा विवेकसिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ आपल्या विदर्भातला आहे.महानुभावाचे पंढरपूर रिद्धपूर हे अमरावती जिल्ह्यात म्हणजे विदर्भात आहे.भाषेच्या वाड्.मयाच्या संदर्भात आपण फार श्रीमंत आहोत.आज मराठी भाषा संशोधनाचे विद्यापीठ स्थापन झाले,आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा विद्यार्थ्यांनी भाषेतून करियरदृष्ट्या रोगजार शोधला पाहिजे.ग्रामीण ऊर्जा ही लढण्याचे बळ देते. आकाशवाणी,इलेक्ट्रिक मराठी वृत्तवाहिण्यांमधील निवेदक,स्क्रिप्ट लेखक,प्रिंट मिडीयातील पत्रकार,मुद्रित शोधक,संहिता लेखक, जाहिरातला स्लोगन लेखक,पुढे संशोधक अनेक अर्थाने मराठी भाषा रोजगार देऊ शकते.तेव्हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मातृभाषेची कास धरली पाहिजे.असे प्रतिपादन नागपूर येथिल कवी,निवेदक,पत्रकार शफी पठाण यांनी मराठी भाषा वाड्.मय मंडळाचे उदघाटनप्रसंगी केले.
महाविद्यालयातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेची मनातील भिती दूर करून रोजगार दिशेकडे वळले पाहिजे.इंग्रजी भाषा ही जगाच्या स्पर्धेत उभे राहायला शिकवते.या व्यासपीठाव जसा गुरुशिष्य योग आला तसाच तो जीवाचे मैत्र साधणाराही योग आहे.डाॅ.प्रगटसिंघ हे माझे विद्यार्थी तर तुमचे प्राचार्य डाॅ.वीरेंद्र जुमडे हे माझे वर्गमित्र आहेत.असे विचार इंग्रजी भाषाअभ्यास मंडळाच्या उदघाटनाप्रसंगी डाॅ.अखिलेश पेशवे यांनी मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.वीरेंद्र जुमडे यांनी आई हा भाषीकदृष्ट्या पहिला गुरू आहे.भाषेतील कुठलाही न्यूनगंड विद्यार्थ्यांनी बाळगू नये असे विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून डाॅ.प्रगटसिंघ बावरा यांनी मराठी , इंग्रजी भाषा वाड्.मय अभ्यासमंडळाची भूमिका मांडली.सभागृहात उपस्थितांना डाॅ.मिलिंद साठे यांनी शफी पठाण यांचा तर डाॅ.बावनकुळे यांनी डाॅ.अखिलेश पेशवे यांचा परिचय वाचून दाखविला. यावेळी अभ्यासमंडळातील विद्यार्थी प्रतीक बानाईत,वेदांती गुडधे,दीपक बांगडे,हरि ठाणेकर, लिलाधर ठाकरे, तन्मय,अपर्णा शेंबेकर,हीतेश खडसे,तुषार सावध,बादल डोईफोडे यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.अरविंद पुनवटकर यांने केले.आभार मराठी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डाॅ.प्रमोद लेंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थितांमध्ये डाॅ.दिनेश किमटा,डाॅ.सचीन वैद्य,डाॅ.प्रशांत पाटील,प्रा.अतुल भोयर, डाॅ.अर्चना पाटील, प्रा.कोहळे,प्रा.मोहुर्ले,प्रा.प्राची देशमुख तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.संपूर्ण सभागृह विद्यार्थ्यांच्या गर्दीने, उपस्थितीने पूर्ण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here