गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक ०६ सप्टेंबर २०२५ रोजी कुमारी सोनाली संजय मरसकोल्हे वय १२ वर्ष हि मुलगी नगर परिषद कळमेश्वर आवारात विजेच्या खांबाला करंट लागुन मृत पावली असुन या आदिवासी मुलींच्या परीवाराला योग्य मोबदला मिळण्यात यावा तसेच मुख्याधिकारी नगर परिषद कळमेश्वर व म.रा.वि.वी कंपनी कळमेश्वर यांच्यावर तहसीलदार कळमेश्वर व पोलीस स्टेशन कळमेश्वर यांच्या मार्फत अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नागपुर,अनुसूचित जमाती आयोग महाराष्ट्र राज्य,जनजाती आयोग नवी दिल्ली यांना आज रोजी १२ सप्टेंबर २०२५ रोजी निवेदन देऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी हरीश कंगाली अध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण, प्रशांत मडावी अध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी नागपुर जिल्हा काटोल,गणपत वाढीवा, संजय चौधरी,बंशिलाल कुंभरे,मंगेश गमे,प्रभाकर पेंदाम,दिनेश कोवे,आशीष इंगळे,प्रवीण कौरती,भूषण कौरती,जीवन बागडे,रविंद्र राऊत,कृष्ण बोडे,मनोहर खोंडे,अविनाश गेडाम इतर आदिवासी बांधव उपस्थित होते.
Home Breaking News मुख्याधिकारी नगर परिषद कळमेश्वर व म.रा.वि.वी कंपनी कळमेश्वर यांच्यावर भाजपा आदिवासी आघाडीची...




