Home सामाजिक साळवे, जिचकार हेच नागपूरचे अधिकृत पदाधिकारी- क्षेत्र संघटक नितीन काकडे

साळवे, जिचकार हेच नागपूरचे अधिकृत पदाधिकारी- क्षेत्र संघटक नितीन काकडे

15
0

अखिल भारतीय ग्राहक पंचायत (र.नं. एस. ९१९४ दिल्ली) नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय साळवे व सचिव प्रभाकर शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी जाहिर केलेली कार्यकारिणीच अधिकृत असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तसेच नागपूर महानगर अध्यक्ष शरद जिचकार तर सचिव म्हणून विनोद चरपे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणीच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची अधिकृत कार्यकारिणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
या दोन्ही कार्यकारिणीनाच अ.भा.ग्राहक पंचायतीच्या केंद्र व विदर्भ प्रांत कार्यकारिणीची मान्यता असून या संघटनेची अन्य कोणत्याही नागपूर जिल्हा व महानगर कार्यकारिणी अस्तित्वात नाही. गणेश शिरोळे हे वारंवार स्वतः जिल्हाध्यक्ष व प्रकाश भुजाडे जिल्हा सचिव असल्याचे सांगून सर्वसामान्य नागरिकांची व प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात काही ठिकाणी बैठकी घेवून करीत असल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केलेआहे.
गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नागपूर जिल्हा व नागपूर महानगराच्या कार्यकारिणी संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे चिन्ह व तोच नोंदणी क्रमांक वापरुन, वृत्त पत्रात बातम्या देवून, ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये तसेच प्रशासना मध्ये सुद्धा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न शिरोळे, गुप्ते, भुजाडे व अन्य काही स्वयंघोषित पदाधिकारी करीत आहेत. वरील मंडळी पैकी कुणीही ग्राहक पंचायती च्या नागपूर जिल्हा व महानगर कार्यकारिणीच्या कोणत्याही पदावर नसून त्यांना अशा प्रकारे संघटनेचा नोंदणी क्रमांक व चिन्ह वापरण्याचा अधिकार नाही असेही नितीन काकडे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्राने मान्यता दिलेल्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, सचिव डॉ. चारुदत्त चौधरी तर संघटक म्हणुन अभय खेडकर हे कार्यरत आहेत. विदर्भातील सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या नियुक्ती संदर्भातील त्यानाच अंतीम अधिकार असल्याचेही क्षेत्र संघटक काकडे यांनी सांगितले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे चिन्ह व नोंदणी क्रमांकाचा अनधिकृतपणे वापर करणार्‍या व्यक्ति विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही काकडे यांनी दिला आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत हे ग्राहकांचे राष्ट्रव्यापी मोठे संघटन असून १९८६ चा ग्राहक संरक्षण कायदा आणि 2019 चा सुधारित ग्राहक संरक्षण कायदा निर्मिती मध्ये या ग्राहक संघटनेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष अँड नारायण भाई शहा असून सचिव जयंत काथेरिया आहेत. याच संघटनेचे नागपूरचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे यांची वरील घडामोडी संदर्भातील प्रतिक्रिया समजू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here