गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी व कोकर्डा या गावांमध्ये स्तनपान सप्ताह 2025 (दि. 1 ते 7 ऑगस्ट) निमित्ताने गावपातळीवर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अदानी फाउंडेशन आणि AWL बिझनेस यांच्या फॉर्च्युन सुपोषण प्रकल्पाद्वारे हा सप्ताह साजरा होत आहे.
हा उपक्रम Nutrition Bureau Nagpur, ICDS विभाग, आशा कार्यकर्त्या आणि आदाणी फाउंडेशनच्या सुपोषण प्रकल्पा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
कार्यक्रमासाठी तेलकामठी गावाचे सरपंच मा. सौ. प्रेमाताई डाफरे व उपसरपंच श्री.ऊमरावजी भुजाडे ग्रामपंचायत सचिव सुनील भोयर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून महिलांना स्तनपान व पोषणाबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.
तसेच डॉ. रंजना राठोड (वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, पोषण ब्युरो, नागपूर) आणि सौ. शालिनी कोतमकार (पोषण अधिकारी, पोषण ब्युरो, नागपूर) यांची विशेष उपस्थिती होती.या उपक्रमात सुपोषण संगिनी सौ. सुषमा मुरमारे, सौ. अनीता कैकाडे, सौ. शैली गोटमारे, सौ. अनुसया देहरे, सौ. वर्षा भोयर आणि सौ. माधुरी काळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. संगिनींनी पौष्टिक आहार प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित महिलांना सहज उपलब्ध साहित्यातून आरोग्यवर्धक व स्वस्त रेसिपीज तयार करून दाखवल्या. यामध्ये सात्त्विक लाडू, मूग डाळ खिचडी, हरभरा कोशिंबीर, पोह्याचा उपमा व सूप यांचा समावेश होता.
तसेच,संगिनी व अंगणवाडी सेविकांनी स्तनपानाचे महत्त्व, नवजात बाळांची निगा, गरोदरपणातील आहार, पहिल्या 1000 दिवसांचे पोषण यावर समुपदेशन सत्र घेतले. आशा कार्यकर्त्यांनीही महिलांना घरगुती पोषणविषयक उपाय व सेवांची माहिती दिली.
कार्यक्रमात महिलांचा, किशोरींचा व कुटुंबातील सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.हा उपक्रम ग्रामीण भागात पोषण व स्तनपानाविषयीची जागरूकता वाढवण्यासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल ठरले.
Home Breaking News स्तनपान सप्ताहानिमित्त तेलकामठी व कोकर्डा गावांमध्ये संयुक्त सुपोषण उपक्रम राबवले




