Home Breaking News पंचायत समिती नरखेड येथे राबविला एक पेड मा के नाम हा उपक्रम

पंचायत समिती नरखेड येथे राबविला एक पेड मा के नाम हा उपक्रम

51
0

दिवसें दिवस कमी होत चालली झाडांची संख्या यामुळे मानवी जीवन धोक्यात धोक्यात येत आहे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून पावसाचे प्रमाण सुद्धा कमी होत आहे परिणामी याचा परिणाम मानवी जीवनावर प्रत्यक्षरीत्या पडत आहे. या उद्देशाने शासनाने वृक्ष लागवड हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला असून हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हे अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग एक पेड मा के नाम हा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पंचायत समिती नरखेड अंतर्गत सर्व ग्रामपंचायत मध्ये विविध प्रजातीचे वृक्ष लागवड कार्यक्रम अजित करण्यात आला होता. या अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असलेल्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात आले.
त्याचप्रमाणे पंचायत समिती कार्यालयातील परिसरात सुद्धा कडुलिंब सिताफळ, आवळा, इत्यादी प्रजातीचे झाडे लावण्यात आली. सदर वृक्ष लागवड कार्यक्रम जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांचे उपस्थितीत हा पार पडला.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामदास गुंजकर, सहा. पंकज चव्हाण गटविकास अधिकारी कृषी विभागाचे कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे, कृषी विस्तार अधिकारी दिपक जंगले , पंचायत विस्तार अधिकारी शृंगारे, चिमोटे, सहायक प्रशासन अधिकारी संगेवार आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here