Home Breaking News संत सावता महाराज पुण्यतिथी महोत्सव सोमवारपासून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे माळी समाज पंच...

संत सावता महाराज पुण्यतिथी महोत्सव सोमवारपासून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे माळी समाज पंच कमेटी व समस्त समाज बांधवांचे आवहान

132
0

सावनेर
दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील माळी समाज पंच कमिटी व समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाची सुरुवात ता.२१ सोमवार रोजी सकाळी ९.३० वाजता डॉ पुरुषोत्तम घोळसे यांच्या हस्ते होळी चौक येथील संत सावता महाराज मंदिरात श्री ची स्थापना व ध्वजारोहण करून होणार आहे.सकाळी ११ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत स्वर्गीय बळीराम चरपे भजन मंडळ,शांताबाई सातपुते यांचे जय भोले भजन मंडळ,श्रीमती गोदाबाई यांच्या मेळातील सावता महाराज भजन मंडळ,भगवंता भाऊ मोरे यांच्या दादाजी भजन मंडळाचा कार्यक्रम होईल.ता २२ मंगळवारी दुपारी एक ते सायंकाळी सहा पर्यंत श्री साईबाबा भजन मंडळ व जय दुर्गा महिला भजन मंडळाचा कार्यक्रम,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ संत सीताराम महाराज भजन मंडळ  बुधवारी ता २३ रोजी ह भ प दिनेश महाराज मोहतुरे यांचे काल्याचे किर्तन व दहीकाला सकाळी ९ ते ११ पर्यंत होईल.
यानंतर दुपारी १२ ते ४ पर्यंत श्रीची भव्यदिंडी व पालखी मिरवणूक निघणार आहे.माजी नगराध्यक्ष रेखाताई मोवाडे,माजी नगरसेविका कमलाताई गायधने,माजी नगरसेविका रंजनाताई बनाईत,माजी नगरसेविका नलिनीताई नारेकर यांच्या हस्ते पालखी पूजन करून शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात येईल कार्यक्रमाच्या समारोपाला संत सिताराम महाराज देवस्थानात सामाजिक कार्यकर्ते मंगेश चरपे,पत्रकार मनोहर घोळसे यांच्या हस्ते नारळ पान होईल महोत्सवाची सांगता महाप्रसादाने होणार आहे शहर व परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवहान माळी समाज पंच कमेटी व समस्त समाज बांधवांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here