गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर सावनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी २५ जून २०२५ नंतर कापूस,तुर,सोयाबीन,ज्वारी अशा पिकाची लागवड व पेरणी केली असून आधीच पावसाच्या कमतरता मुळे पिके वाढ न झाल्याने संकटात आली आहेत.
तर आता एक वेगळच संकट दोन्ही तालुक्यातील अधिकृत खत विक्रेतेच्यामुळे शेतकऱ्याच्या दाराशी पहायला मिळत आहे. पहिल्यांदाच पिकाला पाहिजेल ते खत देणे सुद्धा कठीण झाले असल्याचे पहायला मिळत आहे. तर शासन कडून शेतकऱ्याला पाहिजेल त्या खताची उपलब्धता केले असल्याचे अधिकृत खत विक्रेत्याकडील स्टॉक मध्ये पहायला मिळत आहे.
परंतु एवढे सगळे असुन दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्याला युरीया व डी.ए.पी अशा अनेक खताची कमतरता का भासत आहे. या खतांची मुबलक अशी उपलब्धता असून सुद्धा शेतकऱ्याच्या दारात संकट का ?
तर दोन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशांमध्ये युरीया ३२०,३५० ते ४०० रुपये प्रति हिशोबांनी तर त्याचप्रमाणे इतर खते सुद्धा अवैधरित्या विक्री झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.तर याकडे कळमेश्वर व सावनेर येथील कृषी विभागाद्वारे कोणती कारवाई करण्यात येणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत ?




