गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोज सोमवारी “इंडिया लाईव्ह तेज न्यूज” मध्ये”सावनेर (तिष्टी) मार्गे काटोल मुख्य रोडवर अवैधरित्या खोदून ठेवलेला गड्डा अपघातास आमंत्रित ठरणार का ?”अशी बातमी प्रकाशित होताच.तेलकामठी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चौकी समोर मुख्य रोडालगत माणूस भरायच्या वर अवैधरित्या खोदून ठेवलेल्या जीव घेणे गड्डापैकी एक गड्डा आज दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० ते १० वाजता २ मजुरांनी बुजवला तर अजून त्यालाच लागून असलेला गड्डा भारतीय एअरटेल कॉन्ट्रॅक्टरनी पुन्हा जसाच्या-तसाच ठेवला आहे.आता हा गड्डा कोणाचा अपघात झाल्यास भारतीय एअरटेल केबल बुजवणार का ? तर या विषयीची पुन्हा माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कळमेश्वर येथील उपअभियंता श्री.रुपेश बोदडे हे भारतीय एअरटेल केबल कॉन्ट्रॅक्टर च्या विरुद्ध कोणती कारवाई करतात असा प्रश्न रोज रोडवर आपली गाडी घेऊन ये-जा करत असलेल्या परिसरातील नागरिक उपस्थित केला आहे.




