Home Breaking News तेलकामठीच्या सुपुत्राची मोठी झेप — प्रा. राजेंद्र लापकाले झाले कुलगुरू!

तेलकामठीच्या सुपुत्राची मोठी झेप — प्रा. राजेंद्र लापकाले झाले कुलगुरू!

71
0

गिरीश आंदे (तालुका प्रतिनिधी, कळमेश्वर)
कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी या गावाचे सुपुत्र प्रा. राजेंद्र गोपालराव लापकाले यांची छत्तीसगडचे राज्यपाल यांनी संत गहिरा गुरु विश्वविद्यालय, सरगुजा (अंबिकापूर) येथे कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे कळमेश्वर तालुक्याचा आणि तेलकामठी ग्रामस्थांचा अभिमान उंचावला आहे.
प्रा.लापकाले हे यापूर्वी इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, रायपूर येथे क्षेत्र संशोधन, बियाणे व संशोधन संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी ३३ वर्षांच्या अध्यापन कालावधीत संशोधन क्षेत्रात भरीव योगदान दिले असून १२९ हून अधिक शोधनिबंध विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित केले आहेत. याशिवाय, ‘बाजरी’ विषयावर त्यांचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत तेलकामठी ग्रामस्थ, समाजबांधव तसेच सर्व शिक्षणप्रेमींकडून प्रा.लापकाले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रा.लापकाले यांची ही नियुक्ती केवळ त्यांच्या कर्तृत्वाची दखल नसून,कळमेश्वर तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here