Home अपराध कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील १ गुन्हेगार नागपुर जिल्हयातुन हद्दपार

कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील १ गुन्हेगार नागपुर जिल्हयातुन हद्दपार

20
0

महाराष्ट्र पोलीस कायदा ५६ अन्वये उपविभागिय दंडाधिकारी, सावनेर यांनी पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील सलमान फिरोज शहा वय २४ वर्ष, रा. इंदीरानगर वार्ड कं १२, कळमेश्वर याला हद्दपार केले.

नमुद आरोपी याचेवर दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपीचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी पोलीसांनी त्यांचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु आरोपी यांनी आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली. सदर आरोपी हा गुन्हे करण्याच्या सवयीचा असल्याने तो अशा प्रकारचे गुन्हे करून सामान्य जनतेच्या मनात दहशत पसरवितात तसेच त्यांच्या कृत्यामुळे शांततेचा भंग होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आरोपींचा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (ब) अन्वये हद्दपार करण्याचा प्रस्ताव कळमेश्वर पोलीसांनी उपविभागिय दंडाधिकारी, सावनेर यांचे कडे पाठविला असता त्यांनी प्रस्ताव मंजुर करून नमुद आरोपी सलमान फिरोज शहा वय २४ वर्ष, रा. इंदीरानगर वार्ड कं १२, कळमेश्वर याला २ महीन्यांकरीता नागपुर शहर आणि नागपुर ग्रामीण येथुन हद्दपार केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here