Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून घेतले कळमेश्वर तालुका भाजपाचे वतीने...

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून घेतले कळमेश्वर तालुका भाजपाचे वतीने रक्तदान शिबीर

81
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी कळमेश्वर तालुका व शहराच्या वतीने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 23 जुलैला निशा दत्त सभागृह कळमेश्वर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन भाजपा ज्येष्ठ नेते डॉ राजीव पोतदार यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे कळमेश्वर तालुका भाजपा अध्यक्ष प्रमोद हत्ती,धनराज देव के कळमेश्वर शहराध्यक्ष प्रतीक कोल्हे,प्रकाश वरुळकर,महादेव  इखार ,विलास गणोरकर,निळकंठ तपासे,स्वप्निल चौधरी,वैभव टेकाडे,मंगेश चौरे संयोजक मुकेश भरके,प्रवीण काथवटे,सचिन रघुवंशी,रशीद शेख,प्रगती मंडल,मनीषा लंगडे,नीलिमा धनगरे,रूपाली चुनारकर,कांचन आंबुलकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिबिरामध्ये ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.   
शिबिराचे यशस्वीतेसाठी अभिषेक धोटे,पवन झाडे,वैभव मानकर,आदित्य जिचकार,हर्षल गिरडे,जय हत्ती,रोहित बागडे आदींनी सहकार्य केले.शिबीरा करीता रेनबो ब्लड बँक नागपूर चे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here