गिरीश आंदे
कळमेश्वर–ब्राह्मणी नगरपरिषदेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपचे धनराज देवके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य म्हणून प्रकाश वेरूळकर व अजय मुंडावाईक यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून भाजप कार्यकर्त्यांनी या यशाचे स्वागत केले आहे.
या निवडीमुळे कळमेश्वर–ब्राह्मणी नगरपरिषदेत भाजपची ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




