Home राजकीय सावनेर नगर परिषद उपाध्यक्षपदी भिमराव (राजु) घुगल यांची बिनविरोध निवड

सावनेर नगर परिषद उपाध्यक्षपदी भिमराव (राजु) घुगल यांची बिनविरोध निवड

54
0

गिरीश आंदे
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिमराव (राजु) घुगल यांची सावनेर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सावनेर शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या निवडीबद्दल भिमराव (राजु) घुगल मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्यात नेहमीच सक्रिय असलेले घुगल यांना ही जबाबदारी मिळाल्याने नगर परिषदेमार्फत शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना घुगल यांनी सर्व नगरसेवकांचे आभार मानत, सावनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षभेद न ठेवता काम करणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here