Home राजकीय राष्ट्रवादी शरद पवार गटाला सावनेरमध्ये धक्का – अमर जैन व नाना केणे...

राष्ट्रवादी शरद पवार गटाला सावनेरमध्ये धक्का – अमर जैन व नाना केणे यांचा अजित पवार गटात प्रवेश

24
0

गिरीश आंदे
सावनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे स्थानिक नेते अमरचंद जैन व नाना केणे यांनी आपल्या महिला व पुरुष समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
सावनेर येथील शहराध्यक्ष गोपाल घटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ.राजाभाऊ टाकसाळे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून पक्षबांधणीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी शहराध्यक्ष गोपाल घटे, बाबा झाडे, सुरेंद्र वानखेडे, यामिनी मंडपे, तुषार गायकवाड, चंद्रशेखर कावडकर, दिलावर शेख, महेश बोन्द्रे, भगवान रायकवाड, शांताराम अंतूरकर, वैशाली घटे, अनिताबाई सुरकर, जयश्री रायकवाड, अमोल डहाट, शेषराव वाढीकर, गणपती पठाणे, काना घटे, राजू वाघाडे, निलेश तागडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here