Home क्रीडा आंतरराष्ट्रीय मात्सोगी-डो स्पर्धेत राइनो तायक्वांदोची दमदार कामगिरी – एक सुवर्णासह सात पदकांची...

आंतरराष्ट्रीय मात्सोगी-डो स्पर्धेत राइनो तायक्वांदोची दमदार कामगिरी – एक सुवर्णासह सात पदकांची कमाई

26
0

गिरीश आंदे
नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये दि. 24, 25 व 26 जून 2026 रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय मात्सोगी-डो अजिंक्यपद स्पर्धेत राइनो तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण, चार रौप्य व दोन कांस्य अशी एकूण सात पदके पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत राइनो तायक्वांदो असोसिएशनचे आकाश धोक, प्रतीक जामुनकर, जतिन अंबरते, सुनील सियांग, चंचल नागवंशी, ईश्वरी चौधरी,काशिश बोकडे आणि मानसी गोलायत या आठ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
यामध्ये आकाश धोक याने सुवर्णपदक पटकावत चमकदार यश मिळविले. प्रतीक जामुनकर, काशिश बोकडे, चंचल नागवंशी आणि ईश्वरी चौधरी यांनी रौप्यपदकावर नाव कोरले, तर जतिन अंबरते आणि सुनील सियांग यांनी कांस्यपदक मिळवून संघाचा गौरव वाढविला. मानसी गोलायत हिनेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.मात्र तिला पदकाने हुलकावणी दिली.
या सर्व खेळाडूंच्या यशामागे प्रशिक्षक मनोज बघारे सर, मयूर राऊत सर आणि विजय मंगलकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, भविष्यातही ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अशीच यशस्वी कामगिरी करतील,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्षाचे) सावनेर शहराध्यक्ष गोपाल घटे यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here