Home अपराध साखळी पुरावे जोडत पोलीसांनी कळमेश्वर फेटरी येथील जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणारा जळीत...

साखळी पुरावे जोडत पोलीसांनी कळमेश्वर फेटरी येथील जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणारा जळीत ट्रक प्रकरणात अजुन एका आरोपीला केले अटक

22
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक १६/११/२०२५ रोजी पाहटे फेटरी येथे नागपुर ते काटोल रोडवर एक टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच ४० सी.डी ५०९४ याला आग आगल्याने एकुण २९ जनावरे मृत पावली होती. तसेच ८ गोवंश जनावरे जिवंत मिळुन आले होते. नमुद प्रकरणी पोलीसांनी वाहन चालक, वाहन मालक, क्लिनर तसेच जनावरे वाहनात चढवणार मदतणीस यांना अटक केली असुन सध्या सर्व ४ आरोपी हे पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहे. सदर गुन्हयात साखळी पुरावे जोडत गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक १८/११/२०२५ रोजी पिक अप वाहन कं एम. एच. ४० सी.डी. ६०३५ चा चालक शोएब नौशाद सय्यद, वय २६ वर्षे, रा. लाखणी जि. भंडारा याला लाखणी येथुन ताब्यात घेतले. नमुद आरोपी कडे चौकशी केली असता नमुद आरोपीने जनावरांना गोंदिया जिल्हयातुन त्याच्या ताब्यातील पिक अप वाहन कं एम. एच. ४० सी.डी. ६०३५ मध्ये भरून मौजा महलगाव येथील जंगल परीसरात ट्रक क्रमांक एम एच ४० सी.डी ५०९४ पर्यंत पोहचवुन दिले अशी माहीती दिली. आरोपीला अटक केली आहे. आज रोजी नमुद आरोपीला मा. न्यायालयाने दिनांक २०/११/२०२५ रोजी पर्यंत ३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here