गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक १९ मे २०२५ रोजी कळमेश्वर तालुका धापेवाडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत रुख्मिणी महिला प्रभाग संघाच्या उमेद अभियानांतर्गत झेंडेवाले बाबा देवस्थान धापेवाडा येथे आयोजित महिला बचत गटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी उपस्थित राहून महिलांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी महिला सक्षमीकरण,आर्थिक स्वावलंबन व ग्रामीण विकास या त्रिसूत्रीच्या आधारे महिला बचत गटांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. या माध्यमातून अनेक भगिनींनी उद्योजगतेकडे पावले टाकली आहेत,हे पाहून माझे मन अभिमानाने भरून आले.महिलांनी आपल्या घरापासून गावाच्या विकासा पर्यंत घेतलेली जबाबदारी ही समाजासाठी ऊर्जास्त्रोत आहे. उमेद अभियानासारख्या उपक्रमांनी महिलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर आत्मविश्वास,नेतृत्व आणि नव्या संधीही दिल्या आहेत.
या संवादातून अनेक नवीन कल्पना,अपेक्षा आणि विकासाचे संकल्प समोर आले असल्याचे आमदार डॉ.आशिष देशमुख म्हणाले तर महिलांच्या प्रत्येक प्रयत्ना मागे मी नेहमी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी महिला बचत गटाचे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित महिलांना सांगितले आहे.