गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
मी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर सावनेर मतदारसंघातून भाजपाचे डॉ. आशिष देशमुख २६ हजार मतांनी निवडून आले. माझ्यामुळे काँग्रेसला किंमत मोजावी लागली. पक्षाने माझ्यावर ज्या काटोल विभागाची जबाबदारी टाकली तिथे जि.प.चे २६ सर्कल येतात. त्या ठिकाणी संपूर्ण भाजपा दिसेल, असा दृढ विश्वास नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे १५ मे रोजी प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेमध्ये ते बोलत होते. यंदा भाजपाने जिल्ह्याचे रामटेक व काटोल असे दोन विभाग केले आहेत. यावर काटोल भागाबाबत बोलताना कुंभारे म्हणाले, काटोल मध्ये काटोल, सावनेर आणि हिंगणा असे तीन मतदारसंघ येतात. त्यांत साधारणत जिल्हा परिषदेचे २६ सर्कल येतात.या सर्वच ठिकाणी भाजपाचे उमेदवार जिंकून येतील,असा माझ्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष म्हणुन प्रयत्न राहील.