Home Breaking News नगरसेवकांसाठी कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद येथे इच्छुकांची लगबग वाढली ?

नगरसेवकांसाठी कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद येथे इच्छुकांची लगबग वाढली ?

14
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून कळमेश्वर बाम्हणी नगरपरिषदेवर नगरसेवक बनण्यासाठी इच्छुकांची लगबग वाढली असून निवडणूक आयोगाकडून केव्हा अधिसूचना जारी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील तीन वर्षापासून कलमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेवर प्रशासकराज होते. या प्रशासक राजमुळे विकासकामांना खिळ बसली होती. जनतेलाही आपल्या समस्या कोणासमोर मांडाव्या हा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी कोर्टाच्या आदेशाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे माजी नगरसेवकासह इतरही नगरसेवक बनण्याचे स्वप्न बाळगून असणाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. कळमेश्वर नगरपरिषदेची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर 8 फेब्रुवारी 2022 पर्यंत पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसचे आठ नगरसेवक, भाजपाचे सहा, शिवसेना दोन व राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक होते. तसेच जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या स्मृती इखार यानी बाजी मारली होती. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. देवेंद्र फड़ण्चीस मुख्यमंत्री आहेत. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रावर गेल्या पंचवीस वर्षापासून अधिराज्य गाजविणारे काँग्रेसचे सुनील केदार यांच्या पत्नीचा भाजपचे आशिष देशमुख यांनी पराभव केला होता. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्या मध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. कळमेश्वर ब्राह्मणी शहरांमध्ये काँग्रेस व भाजपा वगळता महाविकास आघाडीतील ठाकरे गट शरद पवार गट तसेच महायुती मधील शिंदे गट, अजित पवार गट सक्रिय दिसून येत नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपचे आशिष देशमुख विजयी झाल्यानंतर आशिष देशमुख व डॉ.राजीव पोतदार यांनी पुढील काळात होणान्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू ठेवली होती. तसेच कार्यकत्यांच्या नियमित बैठका व मेळाव्याच्या माध्यमातून पक्षातील कार्यकत्यांची संघटनात्मक बांधणी करून ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here