आयोजक आ.डॉ.आशिषराव देशमुख यांनी जनतेला केले मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.
ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. रविवार, दिनांक 18 मे ला सकाळी 8.30 ते 9.30 वाजेपर्यंत ही यात्रा खापरखेडा आणि आजूबाजूचा परिसर पादाक्रांत करेल.
भारत-पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, देशभक्तीचा संकल्प घेण्यासाठी आणि नागपूर जिल्ह्याच्या ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. “ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करण्यासाठी या भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. देशभक्तीची व राष्ट्रप्रेमाची भावना या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून प्रतीत व्हावी, यासाठी या तिरंगा यात्रेला विशेष महत्त्व आहे. नागपूर जिल्ह्यातील तमाम जनतेने या देशप्रेमाच्या यात्रेत तिरंगा हाती घेऊन सामील व्हावे”,असे आवाहन तिरंगा यात्रेचे आयोजक आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी केले आहे.
Home Breaking News खापरखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 18 मे ला भव्य ‘तिरंगा...