गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्याचा एकूण निकाल ९१.६७ टक्के लागला. तालुक्यातून एकूण १७ शाळांमधून २१०५ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी अर्ज भरला होता, त्यामध्ये २०७८ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र झाले होते यातून १९०५ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. यामध्ये ५४ विद्यार्थी ७५ टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन, ४२६ विद्यार्थी ग्रेड वन मध्ये, १०७५ विद्यार्थी ग्रेड टू मध्ये तर ३५० विद्यार्थी पास ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले.
शाळांनुसार निकालाच्या टक्केवारीमध्ये न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोहपा (९९.६८), म्यूनिसिपल ज्युनिअर कॉलेज कळमेश्वर (९७.८३), प्रताप माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कळमेश्वर (९२.७०), इंदिरा गांधी आर्ट्स कॉमर्स कॉलेज कळमेश्वर (७०.४९), विनोबा ज्युनिअर कॉलेज तेलकामठी (१००), अजाबराव वानखेडे जुनियर कॉलेज कोहळी (८७.८०), इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेज कळमेश्वर (६६.६६), नवभारत ज्युनिअर कॉलेज गोंडखैरी (८४.८४),श्रीराम ज्युनियर कॉलेज सोनेगाव (७८.६२), श्री कोलबा स्वामी आर्ट्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज धापेवाडा (१००), मानकर आदर्श ज्युनिअर कॉलेज वरोडा (९७.१०), श्री गजानन ज्युनिअर कॉलेज आदासा (८३.०५), गोमुख उच्च माध्यमिक विद्यालय तिष्टी बु. (९३.३३), शिवप्रिया ज्युनिअर कॉलेज केतापार (१००), शासकीय आयटीआय कळमेश्वर (७१.४२), एस काळे स्मृती खाजगी आयटीआय (६६.६६), अजाबराव वानखेडे उच्च माध्यमिक विद्यालय (९६. १५), इंदिरा गांधी कॉमर्स ज्युनिअर कॉलेज (८०.००) असा निकाल आहे.
कळमेश्वर तालुक्यातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संभाजी ब्रिगेडचे नागपुर जिल्हाध्यक्ष शिवश्री.विनोद दादा मानकर यांनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचाली करीता सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.