आज दिनांक 4 मार्च 2025 रोजी 1.30 ते 3.30 वाजता पर्यंत सावनेर उपविभागा अंतर्गत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याच्या प्रसार व प्रसिद्धीसाठी कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेला मा श्री एस ए सरदार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सावनेर, श्री एस आर भरड सह दिवाणी न्यायाधीश सावनेर, श्रीमती एन व्ही रणवीर दुसरे सह दिवाणी न्यायाधीश सावनेर व श्रीमती एस एम गाडे तिसरे सह दिवाणी न्यायाधीश सावनेर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मा श्री अनिल मस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांनी सुद्धा नवीन कायदे व तपासाबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमध्ये आदिवासी आश्रम शाळेचे प्रमुख विद्यार्थी स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच ज्येष्ठ नागरिक ग्रामसेवक तलाठी शिक्षक असे एकूण 170 ते 180 उपस्थिती होती.