गिरीश आंदे ( कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी विश्व मानव रुहानी केंद्र नवानगर (रजि) या अध्यात्मिक आणि सेवाभावी संस्थेतर्फे कळमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बुधला येथील एकूण 23 विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खुर्सापार येथील एकूण १४ विद्यार्थ्यांना नोट बुक्स,पाणी बॉटल,कंपास कीट,पेन्सील बॉक्स,कलर बॉक्स इ. शाळाऊपयोगी साहित्याचे निशुल्क वितरण केल्या गेले.जेणेकरून आर्थिकदृष्टया कमजोर असलेले विद्यार्थी शैक्षणिक प्रगती व्हावी. या उद्देशाने विश्व मानव रुहानी केंद्र, नवानगर या संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मदत केल्या गेली.
विश्व मानव रुहानी केंद्राच्या सामाजिक कार्यकत्यांनी मोठ्या उत्साहानी,सन्मानानी आणि प्रेमानी सेवा केली.विश्व मानव रुहानी केंद्राच्या सदस्यांनी सांगितले की,अशाप्रकारच्या समाजसेवी कार्याचे आयोजन या संस्थेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून केल्या जात आहे आणि यापुढे सुद्धा विश्व मानव विकास रूहानी केंद्र सामाजिक सेवेच्या अशा लोककल्याणाच्या कामामध्ये नेहमीच प्रशासनाला सहकार्य करीत राहील.
Home सामाजिक विश्व मानव रुहानी केंद्र,नवानगर (रनि.) या संस्थेद्वारे गरजु विद्यार्थ्यांना शाळा उपयोगी साहित्याच्या...




