पुरुषोत्तम नागपूरकर (खापा प्रतिनिधी)
सावनेर
रिलायन्स फाउंडेशन तर्फे दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी नंदापुर तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथे पशुचिकित्सा व लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये पशुचे वंध्यत्व निवारण, गोचीड व्यवस्थापन त्यानंतर गर्भधारणा तपासणी असे विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण असे तपासण्या उपचार या ठिकाणी केले. या कार्यक्रमांमध्ये चिकित्सक म्हणून डॉ. सुनील बागडे यांनी जनावरांना ट्रीटमेंट दिली या कार्यक्रमांमध्ये रिलायन्स फाउंडेशन तर्फे काही महत्त्वपूर्ण अशी औषध पुरवण्यात आली. यावेळी 247 जनावरांना सेवा देण्यात आली.तेव्हा सर्व पशुपालक बंधूंनी कार्यक्रमामध्ये उत्फुर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशन चे जिल्हा व्यवस्थापक मनोज काले व कार्यक्रम सहाय्यक भूषण भक्ते यांनी मोलाची कामगिरी केली. तसेच प्रक्षेत्र अधिकारी निकिता सोनुले(अंबुजा फाऊंडेशन) यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.

