Home Breaking News गोपाल घटे यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर येथे महात्मा गांधी जयंती साजरी

गोपाल घटे यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर येथे महात्मा गांधी जयंती साजरी

83
0

सावनेर –
महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता गांधी चौक,सावनेर येथे महात्मा गांधी कमिटी सावनेरच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी कमिटीचे अध्यक्ष व माजी नगर परिषद उपाध्यक्ष गोपाल घटे उपस्थित होते. या कार्यक्रमाला शालिकराम घोरमाडे, शेषराव रहाटे, दिलावर शेख, साहेबराव विरखरे, अशोक उमाटे, गणपती पठाणे, सुभाष मछले, प्रमोद घोरमारे, प्रफुल गावंडे, पुरुषोत्तम बारापात्रे, चंद्रशेखर खेकारे, शांताराम अंतुरकर, शोषण बले, विजय रडके, कान्हा घटे, भोजपुरी घटे, किशोर कावडकर, शेखर कावडकर, आक्रमण धुर्वे, नरेंद्र खोडे, भीमराव डोंगरे, नितीन निखाडे, श्रीराम बोबडे, हिरामण धुर्वे, शमीम भाई यांसह सावनेर शहरातील नागरिक व गांधीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सत्य, अहिंसा व एकतेच्या मूल्यांचा संस्कार करण्याचा संदेश देण्यात आला. वक्त्यांनी गांधीजींच्या विचारांचे व जीवनकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर सर्व उपस्थितांनी शांतता व स्वच्छतेचे वचन दिले.
महात्मा गांधी सावनेर कमेटी अध्यक्ष गोपाल घटे यांनी यावेळी गांधीजींच्या विचारांबाबत मार्गदर्शन करताना सावनेर व कळमेश्वर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा उल्लेख केला. त्यांनी शेतकऱ्यांचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान लक्षात घेता शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here