Home Breaking News धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामूहिक बुद्ध वंदना व मिठाई वाटप

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामूहिक बुद्ध वंदना व मिठाई वाटप

60
0

सावनेर
युवक जागृती मंडळ आणि सुधाकर बागडे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सावनेर बसस्थानकाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर भंते शीलरक्षित महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे उपाध्यक्ष रामराव मोवाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी सिव्हिल सर्जन डॉ. चंदकांत मानकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अरविंद लोधी, युवक जागृती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बागडे, भाजप शहराध्यक्ष मंदार मंगळे, माजी नगरसेवक सुजीत बागडे, पत्रकार मनोहर घोळसे हे मंचावर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि मिठाईचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये लाखोंच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दीक्षा दिली, त्या ऐतिहासिक घटनेचे महत्व आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन लिडर, होमेश्वर डोंगरे, विक्की शेंडे,राजेश बडखाने,मिनाक्षी बागडे आणि सागर मेश्राम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here