गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
सावनेर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या उपस्थितीत पत्रकारांची बैठक पार पडली. ही बैठक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत स्थानिक समस्या, नागरी प्रश्न तसेच विविध सामाजिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. संवाद आणि समन्वयातून समस्यांचे समाधान शोधण्याच्या दृष्टीने अधिकारी आणि पत्रकारांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली.
या बैठकीस अनेक पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासन व प्रसारमाध्यमांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.




