दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सावनेर सेफ सिटी प्रोजेक्ट अंतर्गत सावनेर शहरात कृत्रिम बुध्दीमत्ता आणि चेहरे ओळखण्याची प्रणाली असलेले अद्यावत सी.सी.टी.व्ही निगराणी प्रकल्पाचे चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, नागपुर जिल्हा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सदर सी.सी.टी.व्ही निगराणी प्रकल्पाला सुरक्षा कवच असे नाव दिले आहे. एकूण ९१ अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही कॅमरे लावण्यात आले आहे. या कॅमेऱ्यामध्ये Facial Recognition System आणि Automatic Number Plate Recognition System (ANPR) आहे. सदर अद्यावत सी.सी.टी.व्ही प्रणाली मध्ये वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगारांचा डेटा संग्रहित केल्या जाईल त्यामुळे गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवता येईल. या प्रकल्पाचे माध्यमातून सावनेर शहरातील १५ डार्क क्राईम स्पॉट कव्हर करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील मुख्य चौक ज्यामध्ये गडकरी चौक,गांधी चौक,बसस्टँड,बाजार चौक,होळी चौक,शिवाजी चौक तसेच या शहरातून बाहेर जाणारे व येणारे सर्व एन्ट्री एक्झिट मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे माध्यमातून निगराणी ठेवली जाणार आहे.
सदर कार्यक्रमांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे,मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर , श्यामकुमार बर्वे लोकसभा सदस्य रामटेक क्षेत्र,आशिष देशमुख विधानसभा सदस्य सावनेर क्षेत्र,संदीप पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र,हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण या सर्वांनी आपल्या मनोगत त्यामध्ये ही सीसीटीव्ही यंत्रणा जनतेमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर असामाजिक तत्त्वावर, गुंडगिरी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर वचक निर्माण करेल. या प्रकल्पाच्या माध्यमातुन सावनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. त्याचबरोबर नवीन कायद्याच्या माध्यमातून डिजिटल पुराव्याचे महत्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी सावनेर शहराची सीसीटीव्ही यंत्रणा दोष सिद्धी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे असे प्रतिपादन केले आहे.
या सी.सी.टी.व्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन समारंभाला चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपुर जिल्हा यांच्या सह श्यामकुमार बर्वे लोकसभा सदस्य रामटेक लोकसभा क्षेत्र,डॉ.आशिष देशमुख विधानसभा सदस्य सावनेर कळमेश्वर क्षेत्र,संदीप पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नागपुर परीक्षेत्र , हर्ष ए. पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण , अनिल म्हस्के अप्पर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण ,वृष्टी जैन सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड, सागर खर्डे सहा.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर आणि पोलीस निरीक्षक उमेश पाटील प्रभारी अधिकारी सावनेर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक धनाजी जळक प्रभारी अधिकारी उमरेड तसेच इतर शासकीय अधिकारी,पत्रकार व नागरिक यांची उपस्थीती होती.
सदर समारंभात मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत पोलीस अधिक्षक कार्यालय, नागपूर ग्रामीण जिल्हा महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने निवड झाल्याबाबत आल्याने, नागपूर महसूल क्षेत्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामधून उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर विभाग यांची प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबाबत तसेच नागपूर महसूल क्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन मधुन उमरेड मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, नागपुर जिल्हा यांनी नागपुर ग्रामीण पोलीसांना प्रशस्तीपत्र देवुन त्यांचे कौतुक केले.
Home Breaking News सावनेर शहरातील अद्यावत सी.सी.टी.व्ही निगराणी प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन




