Home सांस्कृतिक व सामाजिक तेलकामठीत श्री नारायण देव महापूजा (बिज) उत्सवाला उद्यापासून प्रारंभ

तेलकामठीत श्री नारायण देव महापूजा (बिज) उत्सवाला उद्यापासून प्रारंभ

116
0

गिरीश आंदे
तेलकामठी येथील बाजार चौक परिसरात श्री नारायण देव महापूजा (बिज) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ ते गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ या कालावधीत भक्तिभावात साजरा होणार आहे. या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
मंगळवार दि. २०/०१/२०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पारंपरिक पद्धतीने पशु पकडणे व भिक्षा मांगणे हा विधी संपन्न होणार आहे.
बुधवार दि. २१/०१/२०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री नारायण देवाची भव्य महापूजा आयोजित करण्यात आली असून या पूजेसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
गुरुवार दि. २२/०१/२०२६ रोजी सकाळी ६ वाजता देवफेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानंतर भाविकांसाठी गोड जेवणाचा प्रसाद दिला जाणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम बाजार चौक, तेलकामठी, ता. कळमेश्वर, जि.नागपूर येथे होणार असून, समस्त भोई समाज व मित्र परिवार, तेलकामठी यांच्या वतीने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here