गिरीश आंदे
कळमेश्वर तहसील येथे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि महाराष्ट्र दिनाचा गौरवपूर्ण उत्सव साजरा केला.तर कळमेश्वर नगर परिषदेच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
या कार्यक्रमाला तहसीलदार विकास बिक्कड, उपअधिक्षक भूमी अभिलेख मिलिंद शिंदे, तालुका कृषी अधिकारी दिपाली कुंभार, नायब तहसीलदार संदिप तडसे, तसेच ज्योती जाधव, संजय कांबळे, मंगेश ढवळे, बिलाल खान आणि तहसील कार्यालयाचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान आमदार कृपाल तुमाने व तहसीलदार विकास बिक्कड यांनी उपस्थितांना कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.
Home महाराष्ट्र कळमेश्वर तहसीलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा – विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने...



